नगर पालिकेत दिसणार महिला राज… वणी न.प. निवडणूकसाठी आरक्षण जाहीर
29 पैकी 15 जागा महिलांसाठी राखीव,
जितेंद्र कोठारी, वणी: आज वणी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात 29 सदस्यांपैकी 15 सदस्य या महिला राहणार आहेत. त्यामुळे यंदा पालिकेत महिला राज दिसून येणार आहे. यात प्रभाग क्रमांक 4, व 6 यातील एक जागा ही अ. जाती महिला राखीव झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 12 मधील 1 जागा ही अ. जमाती महिला राखीव झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 5, 7, 8, 9, 10, 11, 13, या प्रभागातील एक जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे.
तर प्रभाग क्रमांक 14 यात तीन जागा असून यातील 2 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक नगरपरिषदेच्या 14 प्रभागातुन 29 सदस्यांसाठी महसूल भवनमध्ये दुपारी 12 वाजता एका चिमुकल्याच्या हाताने सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांची उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक 5 मधील ब जागा ही सर्वसाधारण अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आहे. तर प्रभाग क्रमांक 11 मधील ब जागा ही सर्वसाधारण अनुसुचित जमातीसाठी राखीव झाली आहे. 29 पैकी 12 जागा या सर्वसाधारण झाल्या आहेत. यंदा नगरपालिकेत 15 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय एक जागा ही सर्वसाधारण अनुसुचित जाती, एक जागा सर्वसाधारण अ. जमातीसाठी राखीव. तसेच 12 जागा या सर्वसाधारण आहेत. त्यामुळे 15 सह इतर जागांवरही महिलांना उभे राहण्याची संधी मिळणार आहे. त्याामुळे यंदा पालिकेत महिला राज येणार आहे.
आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 15 जून ते 21 जून असणार आहे. आरक्षण सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे 24 जूनपर्यंत पाठविण्यात येईल. 29 जूनपर्यंत विभागीय आयुक्त नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणास मान्यता देतील. 1 जुलैपर्यंत सदस्यपदांच्या आरक्षणाची अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा:
चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज
Comments are closed.