आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

युवासेनातर्फे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. युवासेना यवतमाळ उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील ढूमने, विभाग प्रमुख मंगल भोंगळे, शाखा प्रमुख जनार्दन थेटे, पीयूष चव्हाण, ग्रामीण रुग्णालय प्रभारी अधीक्षक डॉ. सुलभेवार, डॉ गोफने तसेच युवासेना सदस्य प्रफुल बोरडे, वैभव हंसकार, निखिल गट्टेवार, सनी गोलाईत, राजु गोलाईत, चेतन शेंडे, राजु चौधरी यावेळी उपस्थित होते.

Podar School 2025

Comments are closed.