डोक्यावर पाटा आपटून घरमालकाचा खून

राजूर कॉलरी येथे पहाटे घडला थरार, आरोपी फरार

जितेंद्र कोठारी, वणी : खोलीचा भाडयावरून झालेल्या वादातून भाडेकरूने मसाला वाटण्याचा दगडाचा पाटा घरमालकाचा डोक्यावर आपटून निर्घृण खुन केला. आज गुरुवार पहाटे 4 वाजता दरम्यान राजूर (कॉलरी) येथे ही थरारक घटना घडली. राजू पोचम बोडपेलवार (45) असे खून झालेल्या घरमालकाचा नाव आहे. तर आरोपी भाडेकरू राकेश केवट (40) हा घटनेनंतर फरार आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक राजू बोडपेलवार हा आपल्या म्हातारी आईसोबत राहत होता. त्याच्या राहत्या घरापासून काही अंतरावर त्याच्या मालकीची एका खोली आरोपी राकेश केवट याला भाड्याने देऊन आहे. राकेश यांनी मागील 2 महिन्यापासून खोलीचा भाडा दिला नाही. त्यामुळे बुधवारी रात्री राजू आणि राकेशमध्ये वाद झाला होता. त्यानंतर राजू आपल्या घरी येऊन झोपला.

पहाटे 4 वाजता दरम्यान आरोपी राकेश हा राजुच्या घरी आला व घराच्या बाहेर ठेवलेला मसाला वाटण्याचा पाटा उचलून गाढ झोपेत असलेल्या राजू बोडपेलवारच्या डोक्यावर आपटला. यात राजू रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाला. दरम्यान मृतकाच्या घराशेजारी राहणाऱ्या त्याचा भावाला राजुच्या घरातून आवाज आला. त्यांनी उठून पाहिला असता आरोपी हा डोक्यावर रक्ताने माखलेला पाट घेऊन जाताना दिसला. भावाने आवाज दिली असता आरोपी यांनी पाट नालीत टाकून फरार झाला.

घटनेबाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तर फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहे. मृतक राजू बोडपेलवार याला दोन विवाहित मुली असून तो आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.