पतसंस्थेत परिवर्तनसाठी 4 डॉक्टर, 2 प्राध्यापक, 1 वकील निवडणूक रिंगणात
पत संस्थेत भ्रष्टाचार, एकाधिकार, तानाशाही, व भाई भतीजावाद संपविण्याचा 'परिवर्तन पॅनल' चा निर्धार
रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या खातेदार असलेल्या मतदारांनी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करावा यासाठी सर्व उमेदवार व कार्यकर्ता जोमाने कामाला लागले आहे. डोर टू डोर जाऊन मतदारांची भेट घेतली जात आहे. पतसंस्थेच्या वणी, वणी ग्रामीण, मारेगाव, मुकुटबन, घाटंजी, आर्णी, यवतमाळ, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, चिमूर, मूल, ब्रह्पुरी, गडचांदूर, राजुरा येथे शाखा आहे. या सर्व शाखेतील मतदारांनी रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची पत कायम राहावी, यासाठी परिवर्तन पॅनलचे ‘कपबशी’ या बोधचिन्हावर फुलीचा शिक्का मारून सर्व उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहन ऍड. भास्कर ढवस, डॉ. मोरेश्वर पावडे, डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.



Comments are closed.