‘परिवर्तन’साठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या फिरताहेत डोअर टू डोअर

संस्थेला प्रगती पथावर नेण्यात अध्यक्ष नाही तर CEO यांचे मोलाचे योगदान

बहुगुणी डेस्क, वणी : रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणुक अगदी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत उभे असलेले उमेदवार व कार्यकर्ता पूर्ण जोमाने प्रचार कामाला लागले आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे जय सहकार पॅनलला संस्थेतून हद्दपार करण्यासाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवार व कार्यकर्ते सतत मतदारांच्या संपर्कात आहे. वणी विधानसभा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता विशेषतः महिला कार्यकर्त्या परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ डोअर टू डोअर फिरत आहे. परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराला मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर मागील अनेक वर्षांपासून काळे गटाचा वर्चस्व आहे. संस्थेमध्ये काम करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी व विशेषकरून अभिकर्ता वर्ग संस्थाध्यक्ष व काही संचालकाच्या तानाशाही वागणुकीमुळे दुखावलेले आहे. मर्जीतील लोकांना व काही व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा कर्ज सहज उपलब्ध करुन देण्यात आला तर गरजू लोकांना चकरा मारुनही कर्ज मिळाले नाही.

अभिकर्ते दुखावल्याचा आरोप
मागील काळात शहरात अनेक पतसंस्था उदयास आली. त्या पतसंस्थे कडून दैनिक बचत अभिकर्त्याना चांगले कमिशन दिले जाते. परंतु रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या अभिकर्त्यानी कमिशन वाढची मागणी केली असता त्यांना काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे साहजिकच बँकेचे अनेक अभिकर्ता निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळ विरोधात काम करणार आहे.

मेघशाम तांबेकर यांचे यशस्वी व्यवस्थापन 

रंगनाथ स्वामी पतसंस्थेला एका छोट्याशा रोपट्यापासून विशाल वटवृक्ष करण्यात विद्यमान अध्यक्षाचा सिंहाचा वाटा आहे,असा खोटा दावा जय सहकार पॅनल कडून करण्यात येत आहे. वास्तविक पाहता रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या विकासात्मक वाटचालीमध्ये कुशल नेतृत्व व मनमिळाऊ स्वभावाचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघशाम तांबेकर यांचे मोलाचे योगदान आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पतसंस्थेच्या खातेदार, अभिकर्ता व कर्मचाऱ्यांशी अत्यंत चांगले संबंध आहे. त्यामुळे संस्थेला उत्तरोत्तर प्रगती पथावर नेण्यात बँकेचे सीईओ तांबेकर यांचे मुख्य योगदान आहे.

हे देखील वाचा –

परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन

Comments are closed.