विद्यार्थ्यांची गुणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे – प्रा. डॉ. दिलीप अलोणे
मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान
भास्कर राऊत, मारेगाव: हमखास यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मेहनत आणि चिकाटी कधीच सोडू नये. हे दोन गुण जर अंगी असले तर कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी उत्तुंग भरारी मारू शकतो, असे गौरवोदगार ज्येष्ठ कलावंत, महाराष्ट्र भूषण प्रा. दिलीप अलोणे यांनी काढले. ते मारेगाव येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्या निमित्त प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष राकेश खुराणा होते. नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, गौरीशंकर खुराणा, भास्करराव धानफुले, नंदेश्वर आसूटकर, वैभव पवार, अनिल गेडाम, ठाणेदार राजेश पुरी, शंकरराव हटकर, प्रिया वानखेडे, वैद्यकीय अधिकारी, अरविंद ठाकरे, शीतल पोटे, गाडगे, कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. या विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहे. अति गुण मिळवण्यासोबतच विद्यार्थ्याने माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांची गुणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे. त्यासाठी त्यांनी सातत्याने नवनवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असेही डॉ. अलोणे म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शेतकरी मात्र समृद्ध झाला नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रा. सतीश पांडे यांनी विद्यार्थ्यांना आधी मी कोण आहे? याचा अभ्यास करावा. पुस्तकी ज्ञान म्हणजे यश नव्हे, यशाचा मार्ग हा खडतर परिश्रमातून जातो असे ते मार्गदर्शन करताना म्हणाले. पाऊस सुरु असतांनाही विद्यार्थी तसेच पालकांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी, प्रास्ताविक माणिक कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार आनंद नक्षणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना, आणि मारेगाव तालुका पत्रकार संघटनेचे सुमित हेपट, मोरेश्वर ठाकरे, गजानन देवाळकर, सुरेश नाखले, भैय्याजी कनाके, सुरेश पाचभाई, धनराज खंडरे, गजानन आसूटकर, सुमित गेडाम, रोहन आदेवार यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
Comments are closed.