मुर्धोनी गावालगत आढळले वाघाच्या पायांचे ठसे

गाव दहशतीत, शेतातून आणले जनावरे परत

जितेंद्र कोठारी, वणी: मुर्धोनी या गावालगत असलेल्या नदीच्या किना-यालगत आज एका प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. सदर ठसे हे वाघाचे किंवा बिबट्याचे असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सकाळी 6 वाजता गावातील पिंटू घोगले हे शेतात जात असताना त्यांना नदीकाठावर वाघाच्या ठशा सदृष्य ठसे आढळून आले. त्यांनी तातडीने याचा व्हिडीओ शुट करून याची माहिती गावात दिली. गावात ही माहिती पसरताच गावातील लोकांनी घटनास्थळ गाठले. ठशांवरून प्राणी गावाकडे जात असल्याचे आढळून आल्याने गावक-यांनी याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाची टीम गावात पोहोचली. त्यांनी गावक-यांना शेतातून आपले जनावरे परत आणण्यास सांगितले. दरम्यान आज दिवसभर गावकरी व वन विभागाचे कर्मचारी ठशांवरून प्राण्याचा शोध घेत होते. मात्र त्यांना वाघ किंवा बिबट्याचा वावर असल्याच्या खुणा परिसरात आढळून आल्या नाही. सदर घटनेमुळे गावात दहशत पसरली आहे.

हे देखील वाचा:

गांधी चौकातील व्यावसायिकाचे हिरे-मोत्याचे दागिने लुटून ठगबाज पसार

नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आजपासून ‘फ्रीडम’ ऑफरला सुरुवात

मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.