मराठा सेवा संघाच्या वतीने गाडगेबाबांना अभिवादन

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कर्मयोगी व लोकसंत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिवस मारेगाव येथे मराठासेवा संघ तालुका शाखेच्या वतीने घेन्यात आला, स्थानिक राज इलेक्ट्रॉनिक्समध्ये दि.२० डिसेंबरला सायंकाळी सात वाजता कर्मयोगी गाडगेमहाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गाडगेबाबांच्या कार्याचा व रोखठोक विचारांचा अवलंब जर समाजातील लोकानी केला तर समाज भयमुक्त होऊन जगु शकेल असे विचार उपस्थितांनी व्यक्त करुन कर्मयोगी गाडगेबाबा यांना त्यांच्या स्मृतीदिनी अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अनामिक बोढे होते. तर उद्धवराव हेपट, अनंत मांडवकर, ज्योतिबा पोटे, कुंदन पारखी, राहुल घागी, चंद्रकांत कुरेकार, प्रमोद लडके आदी कार्यकर्ते अभिवादन सभेत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.