दुचाकीची अज्ञात वाहनाला धड़क, तरुण जागीच ठार

शिरपूर ते खांदला रस्त्यावर भीषण अपघात

जितेंद्र कोठारी, वणी : वणी ते कोरपना मार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिरपूर ते खांदला दरम्यान शुक्रवार रात्री 7 वाजता दरम्यान ही घटना घडली. वैभव विलास हरबडे (24) रा. काटला बोरी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर असे या अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहचले.

मिळालेल्या माहितीनुसार वैभव हरबडे हा तरुण MH34 BD2718 क्रमांकाच्या सीबीझेड मोटरसायकलने शिरपूर मार्गे कोरपना जात होता. शिरपूर पासून 2 किमी पुढे त्याच्या गाडीचा अपघात झाला. घटनास्थळी लोकांना गाडी भर रस्त्याच्या मध्ये पडलेली होती तर दुचाकीस्वाराच्या डोक्याला भीषण मार लागला होता. 

घटनास्थळावरील लोकांनी याती माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वैभवच्या दुचाकीची समोर असलेल्या वाहनाला मागून धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

शिरपूर पोलिसांनी मृतक वैभव हरबडे यांच्या कुटुबीयांना माहिती दिली असून ते घटनास्थळी पोहोचले आहे.

हे देखील वाचा:

पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.