जितेंद्र कोठारी, वणी :शहरातील मुख्य रस्त्यावर मध्यरात्रीनंतर संशयास्पद हालचाली करताना दोघांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश बंडू सोयाम व राहुल शंकर नक्षिणे दोन्ही रा. कनकवाडी, वणी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात दुकानाजवळ लपून बसले होते.
गुरुवार 22 जून रोजी शहरात रात्री गस्त दरम्यान पोलिसांना बस स्थानक समोर मनोज पान अँड डेली निड्स या दुकानाजवळ अंधारात एक युवक संशयास्पदरीत्या हालचाली करताना दिसून पडला. तसेच साई मंदिर चौकात डायमंड बॅटरी या दुकानाजवळ एक इसम अंधारात संशयास्पदरित्या फिरताना सपोनी दत्ता पेंडकर यांना दिसला. पोलीस वाहन बघताच दोन्ही युवक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दोघांना पकडले. रात्री 12 वाजता अंधारात बसून असल्याबाबत विचारणा केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
आरोपी दिनेश बंडू सोयाम(26) व राहुल शंकर नक्षिणे (30) दोन्ही रा. कनकवाडी वणी, रात्रीच्या वेळी चोरी सारखा अदखलपात्र गुन्हा करण्याच्या बेतात असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना अटक करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.