कामांचा धुमधडाका ! सिमेंट रस्त्यासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर
जितेंद्र कोठारी, वणी: वणी विधानसभा मतदार संघात वणी नगर परिषद व मारेगाव नगर पंचायत हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरीता आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत 10 कोटी रुपये मंजूर केले आहे. यात 6.50 कोटीच्या निधीतून वणी नगर परिषद हद्दीत सीमेंट काँक्रीट रास्ते व 3.50 कोटी मारेगाव नगर पंचायत अंतर्गत सीमेंट रस्त्यासाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली आहे. यापूर्वी नगरी विकास विभागाकडून नागरी सेवा व सुविधा कामासाठी तब्बल 20 कोटी रुपये निधीचे कामे सुरु आहे.
वणी नगर परिषद अंतर्गत पद्मावती नगरीमध्ये दोन रस्त्यांसाठी 1 कोटी 90 लाख रुपये, विद्यानगरी मधील रस्त्यासाठी 90 लाख, शिवाजी चौक ते एस. पी. एम. शाळेपर्यन्त सीमेंट रस्त्यासाठी 1 कोटी 10 लाख, एस.टी, बस स्थानक ते ग्रामीण रुग्णालयपर्यन्त रस्त्यासाठी 1 कोटी 20 लाख, विठ्ठलवाडी भागात 1 कोटी 20 लाखाचे सीमेंट रस्ते व वरोरा रोड ते गंगशेट्टीवार मंगल कार्यालय पर्यन्त सीमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी 20 लाख रुपये असे एकूण 6.50 कोटी रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजूरी मिळाली आहे.
मारेगावचाही होणार विकास
मारेगाव नगर पंचायत हद्दीत विविध भागात सीमेंट रस्ते व नाली बांधकामासाठी 3.50 कोटीच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. वरील सर्व कामे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या देखरेखखाली होणार असून सदर कामाची कार्यान्वयन यंत्रणा वणी नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे राहील. येत्या काही दिवसात सदर कामाची ऑनलाइन निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार बोदकुरवार यांनी दिली.
Comments are closed.