वाहून गेलेल्या चौघांचेही मृतदेह आढळले

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड येथील वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेले दोन तरुण वाहून गेले होते. ही घटना मंगळवारी दुपारी घडली होती. अशीच घटना नायगाव येथेही घडली होती. या ठिकाणाहून दोन तरुण वाहून गेलेले होते. या दोन्ही घटनेतील चारही जणांचे मृतदेह सापडले आहे. यातील दोघांचे मृतदेह हे जुनाड येथे सापडले तर नायगाव येथून वाहून गेलेल्या पैकी एकाच कोना येथे तर दुसऱ्याचा माजरी येथे सापडला आहे.

Podar School 2025

मंगळवारी दुपारी रितेश नथु वानखेडे (18) रा. शिवाजी नगर भद्रावती व आदर्श देवानंद वारनाडे (20) गजानन नगर भद्रावती हे दोघे आपल्या मित्रांसोबत जुनाड येथे फिरायला आले. जुनाड येथील पुलावर गप्पा मारत असतांना ते पोहायला वर्धा नदीपात्रात उतरले व वाहून गेले. शिरपूर पोलीस त्यांचा शोध घेत होते. आज सकाळी 11 वाजता दरम्यान रितेश व आदर्श यांचे मृतदेह जुनाड जवळच नदीत मिळून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अशीच दुसरी घटना तालुक्यातील नायगाव येथे घडली. नायगाव येथून सहा जण नदीमध्ये पोहायला गेले. यातील प्रवीण सोमलकर (36) व दीपक कोसुरकर (40) हे दोघेही होते. प्रवीण हा नायगाव येथील जावई असल्याने तो सुट्टीमध्ये आला होता. दुपारी हे पोहायला गेले. यातील प्रवीण व दीपक हे नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रवाहात वाहून गेले.

यांना शोधण्याची मोहीम रात्रीपर्यंत सुरू होती. परंतु अंधार पडल्याने सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.पोलीस व महसूल प्रशासन यांचा शोध घेत होते. प्रवीण यांचा मृतदेह बुधवार सकाळी कोना या गावाजवळ नदीत मिळून आला तर दीपक ला शोधण्याची मोहीम सुरू होती. सकाळी 11 वाजता दरम्यान दीपक याचा मृतदेह माजरी येथील नदीपात्रात आढळून आला.

Comments are closed.