उभ्या आयशर ट्रकवर आदळली दुचाकी, युवक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर मागून दुचाकी आदळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन मार्गावर कायर गावाजवळ शुक्रवार 1 सप्टे. रोजी दुपारी ही घटना घडली. जखमी युवकावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आला आहे.

Podar School 2025

झरीजामणी तालुक्यातील डोंगरगाव येथील नितेश अरुण ढोके (30) हा तरुण काही कामानिमित्त मोटरसायकलने  कायर येथे गेला होता. काम आटोपून परत गावाकडे जात असताना कायर येथून काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या MH 28 BB 3187 या क्रमांकाच्या आयशर ट्रकवर त्याची मोटरसायकल मागुन जोरदार आदळली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात दुचाकी चालक नितेश ढोके याच्या उजव्या पायाला गंभीर इजा झाली. त्याला लगेच वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र पाय अनेक जागेवरून मोडल्याने पुढील उपचाराकरिता त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आला.  

Comments are closed.