एस.टी. बस चालकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : वणी एस.टी. आगारातून बस घेऊन निघालेल्या बस चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली. वणी घोंसा मार्गावर वीरकुंड बस थांब्यावर मंगळवार 12 सप्टेंबर रोजी ही घटना घेली. बस चालक प्रवीण पथाडे याच्या फिर्यादवरून वणी पोलिसांनी वीरकुंड येथील एका आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार म.रा.प.प.नि.च्या वणी आगारातील बसचालक प्रवीण पथाडे मंगळवारी सकाळी 6.45 वाजता बस घेऊन बोर्डा मार्गे निघाला होता. वाटेतच विरकुंड बस थांब्यावर प्रवाशी उतरण्यासाठी बस थांबली असता अचानक आलेल्या दोन मुलांनी चालक केबिनचा गेट खोलून बसचालक पथाडे याला कालर पकडून खाली उतरविले. तसेच मोहोर्ली येथे बस का नाही थांबविली ? या कारणावरून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान गावातील काही लोकांनी मध्यस्थी करून त्याला सोडविले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घडलेल्या घटनेबाबत चालक प्रवीण यांनी वणी बस आगार प्रमुख यांना कळविले. तसेच मारहाण करणारे दोघांविरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये  शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच सरकारी कामात व्यतव्य आणण्याची तक्रार दाखल केली. वणी पोलिसांनी विरकुंड गावातील दोघांना ताब्यात घेतले असता मुख्य आरोपी हा विधिसंघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झाले. बाल पथकाने त्याला विचारपूस केली असता त्याच्या सोबत विरकुंड येथीलच राकेश अशोक परचाके (19) असल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राकेश परचाके याला अटक केली. आरोपीविरुद्द कलम 323, 34, 353, 504, 506, अन्वये गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास सहा.पो.नि. माया चाटसे करीत आहे.  

Comments are closed.