जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बोर्डा गावात एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 17 ऑक्टो. रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. आनंद मनोहर नागरकर (44), रा. बोर्डा, ह.मु. छोरीया ले ऑउट वणी असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक आनंद नागरकर यांची बोर्डा येथे शेती आहे. ते आपल्या कुटुंबासह गणेशपूर येथे छोरीया ले ऑउट मध्ये राहतात. सोमवार 16 ऑक्टो. रोजी नेहमीप्रमाणे आनंद बोर्डा येथे शेतावर गेले होते. मंगळवारी सकाळी बोर्डा येथे वास्तव्यास असलेले आनंदचे वडील शेतात गेले. तेव्हा त्यांना आनंद शेतातील धुऱ्यालगत आंब्याच्या झाडाखाली लोखंडी पलंगावर निपचित पडून असल्याचा दिसून पडला. आनंदच्या तोंडातून झाग निघून होते. तसेच त्याचा शरीर थंडगार पडलेला होता.
घटनेची माहिती तत्काळ वणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून आनंद याचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी वणी ग्रामीण रुग्णालय आणले. मृतक आनंद यांचेमागे आई वडील, पत्नी व दोन मुले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने नागरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आनंद यांनी आत्महत्येसारखा टोकाचा पाउल का उचलेले याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नाही.
Comments are closed.