डम्पिंग समस्या व रस्त्यासाठी पिंपळगाववासी आक्रमक

वेकोलिविरोधात गावक-यांचा एल्गार, रोखली ट्रकची वाहतूक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. यात प्रामुख्याने डम्पिंगची समस्या आहे. याचा परिसरातील गावांना फटका बसत आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊन रस्त याबाबत वेकोलि प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी याबाबत रास्ता रोको आंदोलन केले. भाजपा वणी तालुका कोषाध्यक्ष व माजी सरपंच दीपक मत्ते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वेकोलि प्रशासनाने डम्पिंग तसेच विविध समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती

Podar School 2025

वेकोलि उकणी क्षेत्रा अंतर्गत मौजा पिंपळगाव कडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्या लगत अंदाजे दहा फूट डम्पिंग आहे. ही डम्पिंग घसरून जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावाचा संपर्क तुटण्याचा धोक आहे. गेल्या काही काळात डम्पींग घसरुन अनेक रस्ते बंद झालेले आहे. डम्पिंग गावा जवळ असल्यामुळे तेथील निघणाऱ्या धुळामुळे गावाकऱ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वेकोलि निर्मित पिंपळगावाच्या पूर्वेस रस्त्याचे काम केले जात आहे. हा रस्ता जमिनीपासून अंदाजे २५ ते ३० फूट उंच आहे. यामुळे शेतामध्ये बैलगाडी, वाहन, व इतर वाहतूक करणे कठीण झाले आहे. पिंपळगाव स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता व उकणी गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. याबाबत वारंवार निवेदन व आश्वासन देऊनही वेकोलि कडून रस्ता तयार करण्यात आलेला नाही.

मंगळवार दि, २८/११/२०२३ रोजी सकाळी ६.०० वाजतापासून पिंपळगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजपा वणी तालुका कोषाध्यक्ष तथा माजी सरपंच दीपक मत्ते यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात गावकरी या आंदोलनात उपस्थित झाले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदुरकर, वेकोलि वणी नॉर्थ मुख्य महाप्रबंधक, वेकोली अधिकारी, तहसिलदार वणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी भेट दिली.

Comments are closed.