गाडी रिव्हर्स घेताना चाकाखाली आली चिमुकली, दुर्दैवी मृत्यू

घराबाहेर खेळत असताना घडली घटना, आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: घराजवळ खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीला एका बेलोरो गाडीने रिव्हर्स घेताना धडक दिली. या अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला. तालुक्यातील नांदेपेरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी चालकाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

प्रकाश मारोती केमेकर हे नांदेपेरा येथील रहिवासी आहे. प्रकाश यांना साडेतीन वर्षाचा एक मुलगा व 2 वर्ष 3 महिन्याची देविका नावाची मुलगी आहे. शुक्रवारी ही दोन्ही मुलं त्यांच्या घराजवळ खेळत होती. दरम्यान गावातीलच रहिवासी असलेला प्रज्ज्वल प्रमोद कोल्हे हा आपले महिंद्रा बोलरे मालवाहू वाहन (MH 29 T6753) रिवर्स घेत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र रिव्हर्स घेताना दुर्लक्ष झाल्याने बोलेराच्या मागच्या चाकात देविका हिचे डोके आले. या अपघातात देविकाच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या पालकांनी तिला तात्काळ वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रोज हसत खेळत राहणारी मुलगी एकाएकी अपघातात गेल्याने केमेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला. अखेर या प्रकाश यांचे भाऊ शंकर यांनी सोमवारी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रज्ज्वल कोल्हे याच्या विरुद्ध भांदविच्या कलम 279, 304 अ, 134 (अ), 134 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोउनि धीरज गुल्हाने करीत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.