दक्ष राहा, तुमच्या बाईकचाही होऊ शकतो ‘गेम’

तीन दुचाकी चोरट्यांना अटक, तीन दुचाकी जप्त

विवेक तोटेवार, वणी: स्वत:ची बाईक सर्वांनाच प्रिय असते. तिचा रखरखाव आपण करतो. देखभाल करतो. तिच्या सुरक्षेची काळजी घेतो. तरीदेखील काही चोरटे त्यावर डल्ला मारतात. शहरातून वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली होती. मग पोलिस यंत्रणा लगेच कामाला लागली. काही प्रयत्नांनंतर या चोरीच्या गुन्ह्यातील तीन चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Podar School 2025

वणीतील-यवतमाळ रोडवरील नंदिनी बारजवळून 8 जानेवारी रोजी आशीष देठे यांची दुचाकी क्रमांक MH 29- AF 8378 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वणी पोलिसात देण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला होता. ठाणेदार अनिल बेहेराणी यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोउपनी बलराम झाडोकर व डीबी पथकाला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीला पाठविले. पूनमचंद बंडू पोहिनकर (24) रा. नांदा बीबी, तालुका कोरपना, जि. चंद्रपूर व गोलू संजय वरवाडे (21) रा. भद्रावती यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आल्यात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अशीच एक दुचाकी चोरीची तक्रार 16 सप्टेंबर 2023 रोजी गणेश ढुमणे, रा. लक्ष्मीनगर यांनी वणी ठाण्यात दिली होती. MH 29 X- 4688 ही त्यांची दुचाकी लक्ष्मीनगर येथून चोरी गेली होती. 4 मार्च रोजी चोरीची दुचाकी ही वणी बसस्थानक परिसरातून विकणार असल्याची माहिती ठाणेदार यांना मिळाली. त्यानुसार पोकॉ विकास धडसे व पथकाने सापळा रचला व आरोपी प्रफुल रमेश चौखे (25) रा. गुडगाव ता. भद्रावती याला अटक करून त्याच्याकडून एक विना नंबर प्लेट ची दुचाकी व एक चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बलराम झाडोकर, सुदर्शन वनोळे, विशाल गेडाम, विकास धडसे, पंकज उंबरकर, वसीम शेख, शाम राठोड , शुभम सोनूले, सागर सीडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.

Comments are closed.