सिंधी कॉलोनी जवळून दुचाकी चोरी, चोरीचे सत्र थांबेना

दुचाकी चोरट्यांचा हैदोस सुरुच, सर्वसामान्य त्रस्त

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी येथील लक्ष्मी मेडिकल जवळून सोमवार 4 मार्च रोजी चोरट्यांनी एक दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

सतीश सुरेशराव भारती (50) हे ढुमे नगर वणी येथे राहतात. त्यांचे सिंधी कॉलोनी येथे भागीदारीत एक नाष्टा सेंटर आहे. हॉटेलमध्ये ये जा करण्याकरिता त्यांच्याकडे एव्हीएटर होंडा कंपनीची दुचाकी आहे. सोमवारी दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता ते आपली दुचाकी (MH29 AF 278) ने हॉटेलमध्ये गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी जवळच्या एका मेडिकलसमोर आपली दुचाकी ठेवली. सायंकाळी 6 वाजता ते घरी जाण्याकरिता निघाले. मात्र ठेवलेल्या ठिकाणी त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. पण दुचाकी परंतु दुचाकी आढळली नाही.

त्यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.