विवेक तोटेवार, वणी: चौकात उभ्या असलेल्या दोन मित्रांना चौघांनी बेदम मारहाण केली तर एकाने फायटरने मारून जखमी केले. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. जखमींच्या तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार आदित्य रामआशीष यादव (18) रा. राजूर कॉलरी येथील रहिवासी आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी राजूर येथील साहिल सिद्धीकी, आदित्य जितेंद्र धोटे, सोहेल सिद्धीकी, अहेमद रजा यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारी 15 मार्च रोजी आदित्य व त्याचा मित्र नारायण येडुलवार हे दोघे राजूर येथील भगतसिंग चौकात उभे होते.
दरम्यान आरोपी सोहेल सिद्धीकी (21) हा आदित्यच्या अंगावर धावून आला. त्यानंतर सोहेलचे इतर मित्र हे सुद्धा पुढे येत त्यांनी आदित्य व नारायणला मारायला सुरुवात केली. दरम्यान आरोपी अहेमद राजा याने त्याच्या हातातील फायटरने आदित्यच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.
जीवे मारण्याची धमकी दिल्याने आदित्या आणि नारायण यांनी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून चारही आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.