दोन पेग जास्त झाले, तिथेच झोपला, सकाळी गाडी लंपास

चारगाव चौकीवर स्प्लेंडर चोरी, जास्त घेणे पडले महाग

बहुगुणी डेस्क, वणी: दारू अधिक झाल्याने अपघात झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचत, पाहत असतो. मात्र दारू अधिक झाल्याने एकाला त्याची दुचाकी गमवावी लागली. दारू पिऊन घरी परतताना कॉल आला. रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलताना जास्त झाल्याने तो तिथेच झोपी गेला. मात्र सकाळी उठल्यावर दुचाकी गायब झाली होती.

तक्रारदार हा चारगाव येथील रहिवासी आहे. तो मजुरीचे काम करतो. त्याच्याकडे दुचाकी नसल्याने तो काम असल्यास त्याच्या शेजारी राहत असलेल्या भावाची दुचाकी कामासाठी घ्यायचा. तक्रारदाराला बुधवारी दिनांक 15 मे रोजी बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकी पाहिजे होती. त्याने भावाला दुचाकी (काळ्या रंगाची स्प्लेंडर) मागितली व तो दुपारी म्हैसदोडका येथे गेला होता.

काम संपल्यावर त्याने परतताना दारू ढोसली. दरम्यान गावी परतताना रात्री 9.30 वाजताच्या सुमारास चारगाव चौकीजवळ त्याच्या मोबाईलवर कॉल आला. त्याने गाडी बाजूला रस्त्याच्या कडेला लावली व तो फोनवर बोलू लागला. मात्र दारू जास्त झाल्याने बोलता बोलताच तो रस्त्येच्या कडेला पडला व काही तिथेच झोपी गेला. दरम्यान चावी गाडीलाच लावलेली होती.

सकाळी 6 वाजता जेव्हा तक्रारदाराला जाग आली. तेव्हा त्याला दुचाकी शेजारी दिसली नाही. त्याने व त्याच्या भावाने परिसरात दुचाकीचा शोध घेतला मात्र आढळली नाही. अखेर त्याने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.