वणी, मारेगाव, झरी तालुक्यात पावसाच्या सरी
वणी/विवेक तोटेवार: गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अखेर पहाटेपासून वणी आणि परिसरात पावसाच्या सरींचं आगमन झालं. त्यामुळे उकाड्यापासून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर पावसामुळे शेतमालाचे विशेष नुकसान झाले नसले तरी पाऊस सुरू राहिल्यास गहु आणि चन्याच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
सध्या उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हामुळे लोकांनी कुलर देखील बाहेर काढले. मात्र पाण्याची समस्या असल्याने सर्वसामान्य उकाड्यामुळे त्रस्त झाला होता. मात्र शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसामुळे सर्वसामान्य सुखावला आहे. ढगाळ वातावरणामुळे तरुणाई घराबाहेर पडली. आजच्या रिमझिम पावसाचा आनंद घेण्यासाठी तरुणाईचे पावलं लाँग ड्राईव्ह करण्यासाठी निलगिरी बनाकडे वळली. अनेकांनी टु व्हिलर काढून या आल्हाददायक वातारणाचा आनंद घेतला.
रब्बी हंगामात घेण्यात येणारी मुख्य पिके म्हणजे हरबरा व गहू. हे पीक साधारणतः पडणाऱ्या दवबिंदूवर आधारित असते. हरबरा जवळपास काढून झाला आहे तर तर गव्हाचे पीकही आता अंतिम टप्प्यात आहे. काही शेतातील हरभरा हा कापून सुकण्यासाठी ठेवण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांनी कापनी केलेला हरभरा झाकून ठेवावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तर या पावसाने गव्हाचे नुकसान होणार नाही. परन्तु जर वादळी वा-यासह आणखी पाऊस आल्यास गहू जमिनीवर पडून नुकसान होऊ शकते. किंवा गहू काळा पडू शकते. त्याचा गव्हाच्या किंमतीवर त्याचा परिणाम होऊ शकते. ॉ