कोलगाव येथील इसमाचा अती मद्य प्राशनाने मृत्यू ?

वणीतील यवतमाळ रोडवर आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: एका 65 वर्षीय इसमाचा यवतमाळ रोडवर मृतदेह आढळला. देवराव सदुजी जुनगरी (65) रा. कोलगाव ता. मारेगाव असे मृत इसमाचे नाव आहे. ते सोमवारी वणीत आले होते. संध्याकाळच्या सुमारास यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसर समोर असलेल्या गजानन मंदिरासमोर ते पडलेल्या अवस्थेत होते. ते कोणतीही हालचाल करीत नसताना काही लोकांना आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळू शकले नाही. मृतक यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती आहे. त्यामुळे अती मद्यप्राशनाने तर त्यांचा मृत्यू झाला नसावा, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.