गर्लफ्रेंडचे जुळले लग्न, व्हिडीओ व्हायरल करून बॉयफ्रेंडचे विघ्न

नग्न व्हिडीओ पाठवून केले बदनाम, आत्महत्येची धमकी देत अत्याचार

बहुगुणी डेस्क, वणी: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नाते हे विश्वासावर तरले असते. मात्र काही बॉयफ्रेंड हे याला कलंक ठरतात. गर्लफ्रेंडला ते आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतात. आधी बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तिचे लग्न जुळल्यावर गर्लफ्रेंडचे नग्न व्हिडीओ व फोटो तिच्या भावी पतीला व तिच्या परिचितांना पाठवले. त्यामुळे तिचे लग्न तुटले. अखेर एक्स बॉयफ्रेंडच्या या कारनाम्यामुळे तिने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. वणी तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली.

तक्रारीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वीची घटना असावी. फिर्यादी तरुणी ही तेव्हा 16-17 वर्षांची होती व ती कॉलेज करीत होती. दरम्यान ती तिच्यापेक्षा वयाने तीन ते चार वर्ष मोठ्या असलेल्या रोशन विठ्ठल गोबाडे (24) रा. नांदेपेरा याच्या रिलेशनशिपमध्ये आली. त्याने तिला लग्नाचे वचन दिले. त्यानंतर त्याने फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 या दोन महिन्याच्या कालावधीत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. दरम्यान पीडितेने आरोपीला यासाठी मनाई केली तर आरोपी तिला आत्महत्येची धमकी द्यायचा. मात्र आरोपीची सततची आत्महत्येची धमकी व केवळ शारीरिक संबंधासाठी रिलेशनशिपमध्ये असलेल्या बॉयफ्रेंडपासून ती त्रस्त झाली होती.

काही दिवसांआधी पीडितेचे लग्न जुळले होते. त्यामुळे तिने बॉयफ्रेंडसोबत बोलणे सोडले व भेटीगाठी बंद केल्या. मात्र बॉयफ्रेंड तिला सतत भेटण्यासाठी दबाव टाकायचा. पीडितेने लग्न जुळल्यामुळे भेटू नको. मी या पुढे नवीन सुरुवात करणार आहे. त्यामुळे यापुढे आपला काहीही संबंध राहणार नाही, असे म्हणत तिने ब्रेकअप केले. गर्लफ्रेंड एक्स झाल्याने बॉयफ्रेंडचा तिळपापड झाला. बॉयफ्रेंडजवळ गर्लफ्रेंडचे काही खासगी अश्लिल व्हिडीओ व फोटो होते. त्याने तिच्या भावी नव-याला व नातेवाईकांना सदर फोटो व व्हिडीओ मोबाईलवरून पाठवले. होणा-या नव-याला हा प्रकार माहिती झाल्याने त्याने लग्न मोडले.

बॉयफ्रेंडने विश्वासघात केला. धोका दिला. हे लक्षात येताच तिने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी रोशन विठ्ठल गोबाडे (24) याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम 354, (c), 376 (2) (n) तसेच अत्याचार झाला तेव्हा पीडिता ही अल्पवयीन होती. त्यामुळे पोलिसांनी पोक्सोच्या कलम 3 (1), 4, 5 (1), 6, 11(5), 12 नुसार व व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आयटी ऍक्टच्या कलम 66(E),67 (B) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.  

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ऑफरमध्ये बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क

 

Comments are closed.