गोकुळनगरातल्या व्यक्तीला ‘माखनचोरा’चा नव्हे तर बाईकचोराचा फटका

शेताजवळच्या रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी हातोहात लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: गोकुळ म्हटलं, की आपल्याला ‘माखनचोर’ आठवतो. मात्र वणीतल्या गोकुळनगरातील सुनील सुभाष वाघडकर (32) या शेतकऱ्याला बाईकचोराचा फटका बसला. आपल्या शेतासमोर रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच 29 -एव्ही 6362 चोरट्याने हातोहात लंपास केली. वणी-कायर मार्गावर बुधवारी दुपारी 1.30 ते 2.00 वाजताच्या दरम्यान चोरट्यानं बाईकवर हात मारला.

सुनील वाघडकर शक्यतो सर्वच कामांसाठी आपली बाईक वापरतात. नेहमीप्रमाणेच ते बुधवारी सकाळी १० वाजता आपल्या वाघदरा शेतशिवारात असलेल्या शेतात जाण्यासाठी निघालेत. वणी-कायर मार्गावरील खामनकर यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली दुचाकी उभी केली.

दरम्यान शेतातील त्यांनी सर्व कामे केलीत. तो पर्यंत बाईकसोबत कोणी छेडछाड करेल याची किंचित शंकाही त्यांना आली नाही. सर्व कामं आटोपून दुपारी ते घराकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा जागेवर पार्क केलेली त्यांची दुचाकी दिसून आली नाही. या प्रकरणी सुनील वाघडकर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.