बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी मंगळवारी दिनांक 29 जुलै रोजी मोक्षधाम (चिखलगाव रोडवर) एका स्विफ्ट डिझायर गाडीवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 1 लाख 12 हजारांचा अवैध दारू साठा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत कार व दारू असा 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा अलिकडे जप्त करण्यात आलेला सर्वात मोठा दारुसाठा आहे.
पोलिसांना खबऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळाली की मोक्षधाम (चिखलगाव रोडवर) एक स्विफ्ट डिझायर गाडी संशयास्पदरित्या थांबलेली आहे. तसेच त्यात दारूचा अवैध साठा आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान तिथे त्यांना (MH 49 B 5093) निळी स्विफ्ट डिझायर गाडी मोक्षधाम चिखलगाव येथे उभी होती. तपासणीत गाडीच्या मागील सीटवर आणि डिक्कीत 28 खोक्यांमध्ये 2800 नग 90 एमएल देशी दारूच्या बाटल्या (किंमत 1 लाख 12 हजार रुपये) आढळल्या. गाडीची किंमत 4 लाख रुपये असून तीही जप्त केली.
या प्रकरणी खुशाल शंकर चहारे (वय 37, रा. गुरूनगर, वणी) आणि शाम संभाजी दुर्गे (वय 39, रा. दामले फैल, वणी) याला अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) आणि 65 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि प्रियंका चौधरी यांच्या आदेशानुसार नितीन गेडाम, श्याम राठोड, गजानन कुडमेथे आणि शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास नितीन गेडाम करत आहेत.
प्रेयसीची प्रियकराविरोधात तक्रार, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न



Comments are closed.