करा मधूमेह, युकृताचे आजार, किडनी विकार, वात इ आयुर्वेदिक उपचार

श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्रात एकदा अवश्य भेट द्या

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील लोटी महाविद्यालय समोर असलेल्या श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्रात मधूमेह, यकृताचे आजार, किडनी, पाचन संस्थेचे आजार, वात विकार, त्वचा विकार, मस्तिष्क इत्यादीवर उपचार केले जातात. डॉ. अभिषेक पटले (BAMS, DNYS) हे येथे रुग्णांवर उपचार करतात. नुकतेच त्यांनी एका मधूमेह झालेल्या 70 वर्षीय आजोबांची पायाची जखम आयुर्वेदिक उपचाराने तीन महिन्यांत बरी केली होती. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्यांना पाय कापण्याचा सल्ला दिला होता. अधिक माहितीसाठी व नंबर लावण्यासाठी 8668556878 व 7218501465 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

कुठल्या सुविधा येथे उपलब्ध ?

श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्रात संपूर्ण आयुर्वेदिक परीक्षण व निदान केले जाते. नाडी परीक्षण, आयुर्वेदिक औषधोपचार, पंचकर्म उपचार, अग्निकर्म-विद्धकर्म, रक्तमोक्षण तसेच रोगानुसार आहार मार्गदर्शन व योगा मार्गदर्शन केले जाते. यासह लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी सुवर्णनप्राशन उपचार देखील येथे उपलब्ध आहे.

डॉ. अभिषेक पटले हे मुळचे वणीचे असून त्यांनी पुणे येथून आयुर्वेदाचार्च ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पुणे येथे प्रॅक्टिस केल्यानंतर वणीत त्यांनी विविध आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरु केली आहे. त्यांची परिसरात आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे मार्डी येथे महिन्याचा पहिला व तिसरा बुधवार तर बोर्डा येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आरोग्य सेवा दिली जाते.

पत्ता – श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
जगन्नाथ महाराज देवस्थानाच्या मागे, सपना कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट जवळ
ढुमे नगर, वणी
वेळ स. 10 ते 2 व संध्याकाळी 4 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत
मोबाईल नं. 8668556878 व 7218501465

आयुर्वेदिक उपचाराने 70 वर्षीय डायबेटिक आजोबांची जखम तीन महिन्यांत बरी

Comments are closed.