विवेक तोटेवार, वणी: कोरपना तालुक्यातील वनसडी येथील 27 वर्षीय तरुण सतीश मारोती चिकराम गेल्या 22 जुलै 2025 पासून बेपत्ता आहे. तो स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) वणीच्या बसस्थानक परिसरात काही लोकांना दिसला. परंतु कुटुंबीय आणि पोलीस तिथे पोहोचण्यापूर्वीच तो निघून गेला. सतीशचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू आहेत.
सतीश मारोती चिकराम (वय 27, रा. वनसडी, ता. कोरपना) हा 22 जुलै रोजी काही कारणास्तव घरातून निघून गेला होता. तो टाईल्सचे काम करतो. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्याच्या भावाने कोरपना पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून तपास सुरू केला. दोन दिवसांनंतर सतीशची दुचाकी नदीच्या पुलाजवळ आढळून आली. पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधकार्य केले, परंतु त्याचा कोणताही सुगावा लागला नाही.
15 ऑगस्ट रोजी सतीश वणीच्या बसस्थानक परिसरात दिसल्याची माहिती मिळाली. मात्र, कुटुंबीय आणि पोलीस तिथे पोहोचण्यापूर्वीच तो तिथून निघून गेला. सतीशचा पत्ता लागल्यास कृपया 9146696755 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments are closed.