खळबळजनक: अवघ्या 50 रुपयांच्या जुगाराच्या वादातून गणेशपूरात खून

दगडाने ठेचून खून... दोन दिवसांत खुनाची दुसरी घटना उघडकीस...

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गणेशपूर येथे जुगार खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. 50 रुपयांवरून झालेल्या भांडणात संदीप इसापुरे (वय 37, रा. गणेशपूर) याने संजय कावरे (वय 47) याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला.

प्राप्त माहितीनुसार, गणेशपूर येथील पुलाजवळील स्मशानभूमीजवळ काही इसम जुगार खेळत होते. यावेळी संदीप आणि संजय यांच्यात 50 रुपयांवरून वाद उफाळला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संदीपने संतापात येऊन संजयच्या डोक्यावर दगडाने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे संजय जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. वणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, संदीप इसापूरे याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे गणेशपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

RN सोलर सिस्टीमची झटका मशिनवर पोळा, गणेशोत्सव ऑफर सुरु

Comments are closed.