एकाच परिसरात चक्क 3 दुचाकी चोरीचा प्रयत्न, 1 दुचाकी लंपास

दुचाकी स्टार्ट न झाल्याने 2 दुचाकी रस्त्यावर ठेवून चोरटे पसार

बहुगुणी डेस्क, वणी: घुग्घुस रोडवरील वागदरा जवळ असलेल्या स्वास्तिक लेआऊट व पाटील ले आऊट येथून चोरट्यांनी तीन दुचाकी पळवल्या. मात्र दोन दुचाकी पळवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला तर एक दुचाकी पळवण्यात चोरट्यांना यश आले. विशेष म्हणजे सोडून गेलेल्या दोन्ही दुचाकी या एकाच घरातील आहे. रविवारच्या मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. घराच्या मुख्य गेटची कुंडी तोडून दुचाकी चोरण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने परिसरातील रहिवासी चांगलेच दहशतीत आले आहे. या प्रकरणी दुचाकी मालकाने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

प्राप्त माहिती नुसार, वणी-घुग्घुस रोडवर वागदरा जवळ नवीन वसाहत निर्माण झाली आहे. येथील मांडवकर बारच्या मागील भागात असलेल्या स्वास्तिक लेआऊट येथे घन:शाम इंगोले हे राहतात. रविवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे घराच्या गेटला कुलूप लावून झोपले. मात्र सकाळी उठल्यावर त्यांना पोर्चमध्ये ठेवलेल्या दोन दुचाकी गायब झालेल्या दिसल्या. तसेच मुख्य गेटची कुंडी तुटलेली दिसली. त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना दोन्ही दुचाकी घरापासून 100 ते 150 मीटर अंतरावर आढळल्या. दुचाकीत पेट्रोल नसल्याने दुचाकी स्टार्ट झाली नाही. त्यामुळे चोरट्यांनी दुचाकी त्याच ठिकाणी ठेवून तिथून पळ काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. जर चोरट्यांना दुचाकी चोरण्यात यश आले असते तर त्यांच्या घरी आज एकही दुचाकी नसली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पाटील ले आऊटमध्ये चोरट्यांचे काम फत्ते
या परिसराला लागूनच पाटील ले आऊट आहे. येथे अतुल वाभीटकर हे राहतात. त्यांच्याकडे  पॅशन प्रो (MH9 AS0572) ही दुचाकी आहे. चोरट्यांनी त्यांची दुचाकी रात्री लंपास केली. सकाळी या परिसरात दोन दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला व एक दुचाकी चोरल्याची वार्ता वा-यासारखी पसरली. स्थानिकांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत पोलिसांना माहिती दिली. सध्या वाभीटकर यांनी दुचाकी चोरीची तक्रार दिली असून यावर पुढील प्रक्रिया सुरु आहे.

15 दिवसांआधी झाला होता खून
या परिसरातच 15 दिवसांआधी एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेच्या दहशतीनंतर ज्येष्ठ नागरिकांनी परिसरात फिरणे बंद केले आहे. त्यानंतर आता येथे चोरट्यांचा उच्छाद दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील लोक चांगलेच दहशतीत आले आहे. दरम्यान सातत्याने दुचाकी चोरीच्या घटनेमुळे वणीतील लोक त्रस्त झाले आहेत. चोरीला गेलेली दुचाकी क्वचित प्रसंगी परत मिळते. आता चोरटे थेट मुख्य गेटचा कोंडा तोडून दुचाकी चोरल्या जात असल्याने आणखी किती सुरक्षीतता बाळगावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

प्रवीण खानझोडे यांचा शिवसेना (उबाठा) ला जय महाराष्ट्र !

Comments are closed.