प्रभाग क्रमांक 1 ते 3 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
प्रभाग 1 ब ची निवडणूक चुरशीची... पाहा संपूर्ण निकाल... फक्त वणी बहुगुणीवर...
बहुगुणी डेस्क, वणी: पहिल्या फेरीत प्रभाग 1 ते 3 या प्रभागाची मतमोजणी झाली. यात प्रभाग क्रमांक 1 ब ची निवडणूक रंगतदार झाली. शिवसेना उबाठाचे अजय धोबे यांनी अवघ्या 11 मतांनी विजय मिळवला. तर प्रभाग 2 ब मध्ये अपक्ष उमेदवार राजू भोंगळे यांनी बाजी मारली. पहिल्या फेरी अखेर भाजपने आघाडी घेतली. भाजपने 6 पैकी 3 जागेवर विजय मिळवला तर दोन जागांवर शिवसेना उबाठाने बाजी मारली आहे. तर एक जागा अपक्षाकडे गेली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत भाजपच्या विद्या खेमराज आत्राम या 500 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. जाणून घ्या कुणाला किती मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 1 अ
मीनाक्षी शैलेश जुनघरे – भाजप – 862
वसुधा अनिल ढगे – शिवसेना – 267 (नोटा 45)
प्रणाली गणेश देऊळकर – शिवसेना (उबाठा) – 970
प्रभाग क्रमांक 1 ब
नितीन शंकरराव चहाणकर – अपक्ष – 396
उमाकांत महादेव जोगी – भाजप – 529
अजय पांडुरंग धोबे – शिवसेना (उबाठा) – 540
प्रकाश जनार्धन पिंपळकर – अपक्ष – 392
प्रशांत सुदाम फाळके – आम आदमी पार्टी – 42
कैलास तुकारामजी बोबडे – शिवसेना – 223 (नोटा – 22)
___________________________________
प्रभाग क्रमांक 2 अ
मंजुषा मंगशे झाडे – शिवसेना – 310
ज्योत्स्ना बालाजी धोटे – शिवसेना (उबाठा) – 708
रिता महेश पहापळे – भाजप – 927
पुष्पा मधूकर भोगेकर – अपक्ष – 141 (नोटा 40)
प्रभाग क्रमांक 2 ब
आशिष ज्ञानेश्वर डंभारे – भाजप – 651
राजू किसन तुराणकर – शिवसेना (उ. बा. ठा.) – 398
धनराज रमेशराव भोंगळे – अपक्ष – 685
वैभव अनिल मांडवकर – शिवसेना – 381 (नोटा 11)
________________________________________
प्रभाग क्रमांक 3 अ
अश्विनी विनोद खापणे – शिवसेना (उ. बा. ठा.) – 751
शुभांगी रविंद्र ठेंगणे – शिवसेना – 407
वैशाली विनोद वातीले – भाजप – 941 (नोटा 44)
प्रभाग क्रमांक 3 ब
लक्ष्मण महादेव उरकुडे – भाजप – 865
जगन पुरुषोत्तम खंडाळकर – शिवसेना – 345
अनिकेत अनिल चामाटे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) – 92
अभिजित अरुण सातोकर – शिवसेना (उ. बा. ठा.) – 781
प्रदीप दामोदर सुंकुरवार – आम आदमी पार्टी – 50 (नोटा 5)
________________________________________
अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल



Comments are closed.