मटकाअड्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरूच; तिघांना अटक
वणी/विवेक तोटेवार; वणी पोलिसांच्या मटका जुगारावरील धाडसत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी मटका जुगारावर दोन ठिकाणी धाड टाकली. यात तीन इसमांना अटक केली आहे.
वणी तालुक्यात राजरोसपणे व छुप्या मार्गाने चालणाऱ्या मटका जुगारावर वणी पोलिसांनी फास आवळायला सुरवात केली आहे. मंगळवारपासून रोजच मटका व्यावसायिकांवर पोलीस कार्यवाही करीत आहे. परंतु मटका व्यवसायिकही मागे हटण्यास तयार दिसत नाही. तर इतक्या दिवसांपासून मटक अड्डे सुरू असताना आताच ही कारवाई का करण्यात येत आहे. याबाबत वणीकरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
शनिवारी दुपारी लालपुलिया परिसरात देशप्रेमी धाब्यामागे मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून आरोपी रमेश संभाजीराव खामणकर वय 45 वर्ष राहणार बोधे नगर चिखलगाव याला अटक केली. त्याच्याकडून 1630 रुपये व मटका जुगारासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याच दिवशी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान वणीतील यात्रा मैदान येथे मटका सुरू असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. त्यांनी येथे धाड टाकून शेख जलील शेख कासम (56) व आकाश हनुमान पेंदोर (29)यास अटक केली आहे. यांच्याकडून 7220 रुपये व जुगारसंबंधी जप्त करण्यात आले आहे.
अटक केलेल्या तिघांवरही कलम 12 (अ) जुगार प्रतिबंधक कायद्यनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महत्वाचे म्हणजे रमेश खामनकर व शेख जलील यास शुक्रवारीही मटका चालविताना अटक करण्यात आली होती. कोर्टातून जामिन मिळताच दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच गुन्हया अंतर्गत दोघांनाही अटक करण्यात आली. यावरू मटका व्यवसायिकांना कायद्याची भीती उरली नाही हेच दिसून येत आहे.