क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंना जयंती निमित्य अभिवादन

0

मारेगाव: दिनांक 11 एप्रिलला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त माळी महासंघ तालुका मारेगाव शाखा आणि भारिप तर्फे जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष तहसीलदार विजय साळवे व विनोद गाणार यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकून उपस्थिताना मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक सुनील इंगळे, प्रवीण खवसे, भारतीय बौद्ध महासभेचे पालकमंत्री भगवानजी इंगळे, माळी महासंघाचे गणेश सोनुले, कार्तिक शेंडे, सुधाकर लोनबले, ज्योतिबा पोटे, नागेश रायपुरे, नारायण शेंडे, संतोष शेंडे, महेश वाटगुरे, तसेच गजानन चंदनखेडे, गौतम दारूंडे, अजाबराव गजभिये, राजेंद्र करमनकर, विष्णुजी वानखड़े, रमेश चिकाटे, गुलाब वानखड़े आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमोल गुरनुले यांनी केले तर आभार पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.