विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांना आंबेडकर यांना जयंतीला प्रबोधनातून आदरांजली

श्री संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचाद्वारा व्याख्यानाचे आयोजन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः स्थानिक श्री संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचाद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संत रविदास सभागृह येथे दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता हा अभिवादन सोहळा होईल. सामाजिक कार्यकर्ते संभाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील वक्ते प्रा. रमेश बिजेकर यांचे यावेळी व्याख्यान होईल.

Birthday

समाजाला दिशा मिळावी व महामानवांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विखुरलेला समाज एकसंध झाला पाहिजे. अनेक समाजपयोगी कार्य झाले पाहिजे. एकीचे बळ समाजाच्या उन्नतीसाठी कामात आले पाहिजे या उद्देशाने व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याचे आयोजक व युवा मंचाचे किसन संभाजी कोरडे यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संदीप केशवराव वाघमारे समाजातील या युवकाने आंतरजातीय विवाह करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. त्यानिमित्त त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

श्री संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचाचे महेश लिपटे, किशोर हांडे, अमोल बांगडे, राहुल पिंपळकर, रवी धुळे, हेमंत वाघमारे, अनिकेत वाघमारे व संपूर्ण कार्यकर्ते या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांनी व सजग नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजन समितीने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.