मराठा सेवा संघाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

0

मारेगाव: भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्य मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने दि.१४ एप्रिलला सकाळी १० वाजता अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मराठा सेवा संघाने गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत कुणबी, मराठा, धनगर, माळी व इतर बहुजन समाजातील लोकांंपुढे प्रबोधनाच्या माध्यमातून खरे बाबासाहेब पोहोचवले. त्यामूळे बाबासाहेबांचे कार्य हे सर्व समाजासाठी अंधकारातुन प्रकाशाकडे नेऊन समाज आज भयमुक्त होत असल्याने त्यामुळे आज बाबासाहेब सर्व समाजाचे उद्धारकर्ते आहे. त्यांच्या जयंती निमित्य मराठा सेवा संघाच्या वतीने मानवंदना देन्यात आली.

यावेळी मसेसंचे अध्यक्ष अनामिक बोढे, जिल्हाकार्याध्यक्ष अनंत मांडवकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, सचिव ज्योतिबा पोटे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष कुंदन पारखी, रुद्राजी कुचनकर, प्रमोद लडके, राहुल घागी, प्रकाश कोल्हे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.