पाण्याकरिता शेवटी त्याने सोडले अन्न

न. पा.च्या वेळकाढू धोरणांचा फटका

0

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषदेला पाईपलाईनचे काम करून देण्याबाबत अनेकदा तक्रारी, अर्ज तसेच विनंती सादर करण्यात आल्या. परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी  काम करण्यास प्रचंड उदासीनता दाखवीत आहेत. याबाबत उपोषणकर्ता दादाजी लटारी पोटे हे नगर परिषदेच्या समोर सोमवार 23 एप्रिलला  11 वाजता उपोषणास बसले.

मंगळवारी त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. परंतु कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शिवाय उपोषणकर्त्यास काहीही केल्यास काम होणार नाही अशी ताकीदही कर्मचारी व अधिकारी देत असल्याचे कळते. शिवाय उपोषणकर्त्यावर मुख्याधिकारी व नगर परिषदेचे कर्मचारी दबाव आणीत असल्याचे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे. दादाजी यांनी  रंगनाथनगर येथे पाइपलाइनचे काम करावे याबाबत 2015 पासून नगर परिषदेच्या अनेकदा अर्ज दिले. परंतु त्यांच्या अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्गाचा स्वीकारल्याचे त्यांनी वणी बहुगुणीशी बोलताना सांगितले. सदर कामाबाबत उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व प्रकरणाबाबत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, ‘उपोषणकर्ता हा पूर्णपणे खोटा बोलत आहे. आम्ही कुणालाही धमकी दिली नाही. शिवाय  आपल्या रास्त मागण्या मान्य करून घेण्यासाठी  उपोषणाला बसणे हा नागरिकाचा अधिकार आहे सदर पाईपलाईनचे काम पालिका लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.