क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे मोहोर्ली येथे अनावरण

झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन

0

गिरीश कुबडे, मोहोर्लीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि. 13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, गोंडी ढेमसा, नृत्यस्पर्धा असे अनेक कार्यक्रम झालेत. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासीसेवक, अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभा, आदिवासी स्वायत्त परिषदेचे अध्यक्ष तिरू. दिवाकर पेंदाम, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तिरू. निरंजन मसराम, बळवंत मडावी, रामचंद्र कांटगे, सोनुआ नैताम, सिडाम आरजू, नागोराव मसराम, आदिवासीमित्र डॉ. महेंद्र लोढा, बंडू सिडाम, तिरू. अरविंद नैताम, हिरासन उईके, गुरूचरण नायक, अरविंद डाहुले, विठ्ठल कोडापे, राजू पावडे, शंकर पावडे, रमेश मोहिते, शीला कोडापे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

यावेळी बोेलताना ना. हंसराज अहीर म्हणाले की, आदिवासींनी देशासाठी फार मोठं काम केलेलं आहे. त्यांनी आपली संस्कृती, परंपरा सातत्याने जोपासली आहे. स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. हा समाज कोणावरही अवलंबून नाही. यांचा आता हळूहळू विकास होत आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांनी ब्रिटीश राजवटीला कसे सळो की पळो करून सोडले यावरही ते बोलले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही बोदकुरवार म्हणाले.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा उद्घाटनपर भाषण करताना

 

या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी आदिवासींच्या जीवनमानातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. जल, जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करणारा हा समुदाय असल्याचेही ते म्हणाले. आदिवासी समुदायातील अनेक महामानवांनी इतिहास घडविला. वीरांगणा महाराणी दुर्गावती यांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला.आदिवासी हे स्वातंत्र्यप्रेमी आहेत. ते निसर्गाचे, पर्यावरणाचे पूजक आहेत. ते यांचे रक्षकदेखील आहेत. आदिवासी हे झाडांशी, दगडांशी, नद्यांशी बोलू शकतात. ते निसर्गाचाच एक भाग आहेत.

आदिवासीमित्र पुरस्काराने सन्मानित असलेले डॉ. महेंद्र लोढा हे या क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करीत आहेत. त्यांनी जवळपास 150 आदिवासी वसाहती दत्तक घेतल्या आहेत. यावेळी डॉ. लोढा म्हणाले की आदिवासी आपली संस्कृती, भाषा व परंपरा सांभाळत आहेत, ही आनंदाचीच बाबा आहे. मात्र त्यासोबतच त्यांच्यापर्यंत सगळं नवनवं तंत्रज्ञान पोहचणंदेखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा त्यांना मिळाल्याच पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना या कार्यात प्रत्यक्ष आलेले अनुभव त्यांनी मांडले. आदिवासी समुदाय हा निसर्गात जगतो. तो निसर्ग सांभाळतो. पर्यावरणपूरक अशी त्यांची जीवनप्रणाली असते. त्यांची निसर्गाची नाळ तुटू न देता त्यांना आधुनिक आरोग्यसेवा, शिक्षण, वाहतुकीची साधने, अशा अनेक अंगांनी मुख्य प्रवाहात आणणेदेखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आदिवासी समुदायांचा खरा इतिहास हा अत्यंत दिव्य व उज्जल आहे, तो समोर आणणे गरजेचे आहे. त्यांनी आदिवासींसाठीे केलेल्या कार्यातून त्यांना कसा लाभ झाला हे त्यांनी सांगितले. केवळ पोकळ घोषणा न देता प्रत्यक्ष कार्य आदिवासींसाठी केलं पाहिजे असाही आग्रह डॉ. लोढा यांनी धरला.

आदिवासीमित्र डॉ. महेंद्र लोढा आपले आदिवासींच्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मांडताना

यावेळी हिराशीम मरकाम, सोनुआ नैताम, पुष्पा आत्राम व मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.

आयोजन समितीचे भिवाजी मडावी, किसन टेकाम, विनोद मडावी, लटारी मेश्राम, रमेश कोडापे, चरणदास कोडापे, सतीश टेकाम, गौतम मेश्राम, अरुण टेकाम, अंकुश गेडाम, आकाश टेकाम, चंद्रकांत टेकाम, गणेश टेकाम, शंकर टेकाम, राहुल उइके, नामदेव कोडापे, संजू येरकाडे, शुभम आत्राम, गजानन टेकाम, अशोक गेडाम, ्यरामदास टेकाम, देविदास कनाके, रमेश मोहिते, विकास कोडापे, धनराज टेकाम, सुभाष टेकाम, प्रमोद टेकाम, भालचंद्र मेश्राम, दादाराव टेकाम, कैलास गेडाम, दिनेश मडावी, गंगाधर गेडाम, सुरेंद्र टेकाम, शंकर टेकाम, यादव टेकाम, रमेश मोहितेसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला कमिटी, नवयुकव बिरसा मुंडा समिती, नायगाव, भिमालपेन देवस्थान सावंगी, नवयुक आदिवसी संस्था म्हातारदेवी, गाेंडवाना संग्राम परिषद, शेवाळा, न्यू नॅशनल असोसिएशन ऑफ गोंडवाना गृप विरकुंड, गोडवाना समाज समिती तसेच विविध कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य, समाजबांधवांनी या कार्यासाठी अथक परिश्रम घेतले. गुरुदेव सेवा मंडळ तथा डॉ. महेंद्र लोढा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, गावकरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यथायोग्य योगदान केले.

लिंकवर क्लिक करून पाहा कार्यक्रमाचा व्हिडीओ…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.