नवयुवक बिरसा मुंडा समितीद्वारा मोहोर्ली येथे विविध कार्यक्रम रविवारी

सोनुआ नैताम, सिडाम आरजू, नागोराव मसराम, डॉ. महेंद्र लोढा, बंडू सिडाम करतील मार्गदर्शन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि.13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना, दुपारी प्रबोधन, सायंकाळी गोंडी ढेमसा व रात्री नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांना आदिवासीमित्र डॉ. महेंद्र लोढा, वणी पो.स्टे.चे ठाणेदार बाळासाहेब खाडे आणि चंद्रकांत टेकाम यांच्यावतीने अनुक्रमे 5,001 रू, 3001 रू, 2001रू. बक्षिस देण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासीसेवक, अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभा, आदिवासी स्वायत्त परिषदेचे अध्यक्ष तिरू. दिवाकर पेंदाम राहतील. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या सोहळ्याला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तिरू. निरंजन मसराम, बळवंत मडावी, रामचंद्र कांटगे, सोनुआ नैताम, सिडाम आरजू, नागोराव मसराम, डॉ. महेंद्र लोढा, बंडू सिडाम मार्गदर्शन करतील. तिरू. अरविंद नैताम, हिरासन उईके, गुरूचरण नायक, सुनील कातकडे, संजय पिंपळशेंडे, अरविंद डाहुले, विठ्ठल कोडापे, राजू पावडे, शंकर पावडे, अर्जुन मुंडा, रमेश मोहिते, शीला कोडापे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.

आयोजन समितीचे भिवाजी मडावी, किसन टेकाम, विनोद मडावी, लटारी मेश्राम, रमेश कोडापे, चरणदास कोडापे, सतीश टेकाम, गौतम मेश्राम, अरुण टेकाम, अंकुश गेडाम, आकाश टेकाम, चंद्रकांत टेकाम, गणेश टेकाम, शंकर टेकाम, राहुल उइके, नामदेव कोडापे, संजू येरकाडे, शुभम आत्राम, गजानन टेकाम, अशोक गेडाम, रामदास टेकाम, देविदास कनाके, रमेश मोहिते, विकास कोडापे, धनराज टेकाम, सुभाष टेकाम, प्रमोद टेकाम, भालचंद्र मेश्राम, दादाराव टेकाम, कैलास गेडाम, दिनेश मडावी, गंगाधर गेडाम, सुरेंद्र टेकाम, शंकर टेकाम, यादव टेकाम सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला कमिटी, नवयुवक बिरसा मुंडा समिती, नायगाव, भिमालपेन देवस्थान सावंगी, नवयुक आदिवसी संस्था म्हातारदेवी, गांेडवाना संग्राम परिषद, शेवाळा, न्यू नॅशनल असोसिएशन ऑफ गोंडवाना गृप विरकुंड, गोडवाना समाज समिती तसेच विविध कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य, समाजबांधव तथा गावकरी या कार्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.