विवेक तोटेवार, वणी: वेकोलिसाठी चालणा-या कंपनीच्या खासगी वाहन चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. सरकारी नियमांप्रमाणे त्यांनी वेतन मिळावे यासाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. अखेर एकता असोसिएशनचे संस्थापक संजय देरकर यांच्यामध्ये आणि वेकोलिच्या अधिका-यांमध्ये चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. वेकोलि अधिका-यांनी वाहन चालकांच्या सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
वणी तालुक्यातील उत्तर क्षेत्रामध्ये हंसा, इंडिया, संजय, किंग्स, राजहंस या खाजगी वाहन कंपनी ठेकेदारी पद्धतीने काम करत आहे. त्याच खाजगी कंपनीमध्ये काम करत असलेल्या चालकांनी सरकारी नियमानुसार वेतन मिळत नसल्याने वेळोवेळी खाजगी कंपनी व वेकोली अधिकाऱ्यांना निवेदन दिली. मात्र चालकांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. तब्बल 9 तास हे आंदोलन चालले.
वाहन कंपनीचे मालक, वेकोली अधिकारी व संजय देरकर यांच्यात चर्चा झाली. शेवटी वाहन कंपनीच्या मालकाने मागण्या मान्य केल्या आणि लेखी आश्वासन सुद्धा दिले. लेखी आश्वासनाची लवकरात लवकर अंबलबजावनी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संजय देरकर यांनी दिला.
या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समिति युवा आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला होता. यावेळी एकता असोशिएशनचे संस्थापक संजय देरकर, कृ. उ. बा. स.सभापती संतोष कुचनकर, कृ. उ.बा.स.संचालक पेमानंद धनोरकर, अजय देठे हे उपस्थित होते. आंदोलन यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी एकता असोशिएशनचे अध्यक्ष धर्मेन्द्र डोहे उपाध्यक्ष राजु चिंचोलकर सचिव आकाश सुर व सर्व चालकांनी परिश्रम घेतले.