मुकुटबन सरपंच शंकर लाकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण
सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपणाचे कार्य सुरू आहे. तालुक्यातही ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येथील पंचायत समिती, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, हायस्कूल व इतर सामाजिक संघटना यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. दिलेले टार्गेट लवकरच पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत आहे .
पर्यावरण संतुलित राहण्याकरिता व वृक्षारोपण करण्याकरिता मुकुटबनचे सरपंचसुद्धा सरसावले. भेंडाला बिट क्र २० मधील वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानुसार १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष असून त्याच अनुषंगाने मुकुटबनचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच दयाकर कप्परवार (अर्धवन), स.व्य समिती अध्यक्ष दत्तू ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, सहायक वनरक्षक करूडे, टोंगे, कुडमेथे तसेच मागुर्ला व सावळी येथील ग्रामस्थ हजर होते.