पुरात वाहून गेलेल्या युुवकाचा सापडला मृतदेह

रविवारी पेटूरचा पूल पार करताना गेला होता वाहून

0
विलास ताजने,(मेंढोली):  वणी वरून मेंढोली येथे जाताना पेटूरच्या पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आज बुधवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पेटूरच्या स्मशानभूमी जवळ दिसून आला.

वणी तालुक्यातील मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर हा २७ वर्षीय युवक रविवारी सायंकाळी  ६ वाजताच्या सुमारास पूल पार करताना वाहून गेला. गेल्या तीन दिवासापासून शोध पथक आणि ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते.

पुरात वाहून गेलेला तरुण सुनिल सुभाष भोयर, मेंढोली

संततधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या.आज सकाळी त्याचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत सापडला. मृतकाच्या कपड्यावरून तो मृतदेह सुनीलचा असल्याची खात्री आहे.

आज सकाळी मेंढोली येथील युवक गणेश कावडे, रवी खाडे, अनंता भोयर, रमेश कुचनकार, राहुल वासेकर यांनी शोधकार्याला सुरुवात करताच सदर मृतदेह आढळून आला.

लिंकवर वाहून गेल्याचा लाईव्ह व्हिडीओ…

Live video….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.