विदर्भा नदीवरील पूल खचला

कायर ते सिंधी वाढोना वाहतूक बंद

0

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यात चार दिवस सतत पडलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले. अशातच विदर्भा नदीचे पाणी ओसरताच सदर नदी वरील पूल वाहून गेल्याचे दिसून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पूल वाहून गेल्यामुळे डोंगरगाव, सिंधीवाढोना, कोसारा वाहतूक बंद झाली. नदी पल्याड शेती असणाऱ्या शेतकऱ्याना शेतकामासाठी ये-जा करणे कठीण झाले आहे.

सध्या दुचाकी कशीबशी पुलावरून काढता येते. त्वरित पुलाची तात्पुरती डागडुजी करून पूल वाहतुकीसाठी योग्य करावा अशी मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.