तीन पोलिसांची एसपींसमोर पेशी

कोळसाचोरीच्या वसुलीमध्ये महत्त्वाची भूमिका ?

0

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर येथील दोन आणि वणी येथील एक अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी एसपींसमोर पेशी झाली. पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा चोरीमध्ये वसुलीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांची पेशी झाल्याचे बोलले
जात आहे. कोळसा वसुली प्रकरणी यांची चांगलीच पिसं काढल्याची चर्चा देखील आहे.

पैनगंगा खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची तस्करी होती. या खाणीतून अवैधरित्या कोळसा शिरपूर वणीतील लालपुलिया परिसरात आणला जातो. तिथे हा माल विकला जातो. यातून दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. कोळसा चोरी करताना यात अनेक लाभार्थी आहे. ड्रायव्हरपासून सुरू झालेली लिंक ही पुढे राजकीय पुढा-यांपर्यंत येऊन ठेपते. यात पोलीस, वाहतूक विभागाचे काही कर्मचारी मोठ्या प्रमाणात गुंतले आहे. रोज लाखोंच्या होणा-या या व्यवहारात पोलीस महत्त्वाची भूमिका बजावते.

कोळसा चोरी हा सध्या परिसरात सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेला अवैध व्यवसाय आहे. हा व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. कोळशाच्या या तस्करीमध्ये वसुलीची मोठी भूमिका पेशी झालेल्या पोलिसांनी बजावली. याच कारणासाठी त्यांची पोलीस अधिक्षकांसमोर पेशी झाल्याची माहिती समोर येत आहे. आता या वसुली कर्मचा-यांवर पोलीस अधिक्षक  काय कार्यवाही करतात की केवळ समज देऊन सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.