तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या खरीप हंगामात शेतकरी आर्थिक नुकसानी पासून वाचला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्याना बोंड अळीचे नियत्रंण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून येथील कृषी कार्यालयात तालुका कृषीअधिकारी राकेश दासरवार यांनी शेतकऱ्यापर्यंत बोंडअळी संदर्भात जे गैरसमज आहेत, त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे म्हणून पत्रकार परिषद आयोजित करुन त्या संदर्भात माहिती पत्रकारांना दिली.
मारेगाव तालुक्यात या वर्षी २६ हजार हेक्टर कपाशीची लागवड व साडे आठ हजार हेक्टर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली. कृषीमालावर किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषीविभागाकडुन शेतकऱ्यांना गावोगावी, शिवारात जाऊन मोठ्या प्रमाणात कीड व्यवस्थापन कसे करायचे यांसंदर्भात वारंवार मार्गदर्शन होत आहे. किडीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचं निदर्शनात येत आहे. याचं कारण म्हणजे शेतकर्यांकडून कीड नियंत्रण हे सामूहिकरीत्या होत नसून,या मधे कपाशीवर रस शोषण करणारे चार प्रकारचे कीटक आहेत. सध्या ते नुकसान पातळीच्या खाली असल्याने वेळीच उपाय योजना केली तर कीड नियंत्रण लवकर होईल. त्यात मावा,तुडतुडे, फुलकिडे,पांढरी माशी यावर प्रतिबंध करण्यासाठी परिसरातील शेतकर्यानी सामूहिक एकात्मिक कीड नियंत्रण करणे काळाची गरज असून आपल्या शेतात कृषीविभागच्या सल्ल्याने आपल्या शेतात एकरी आठ कामगंध सापळे लावणे गरजेचे अाहे. या सापळ्यावर वैशिष्ट्ये म्हणजे याकडे बोंड अळीचे नर पतंग विशिष्ट प्रकारच्या गोळीमधे मादी पतंगाच्या वासाने नर पतंग आकर्षीत. होत असल्याने ते सापळ्यात अडकून नर पतंगाची संख्या कमी होत असल्याने मादी पतंग नपुंसक अंडे देते. त्यामुळे कीड नियत्रंण करण्यास कामगंध सापळे शेतकर्यासाठी फायदेशीर आहे.
गुलाबी बोंड अळीचा पतंग ४ ते६ दिवसात बाहेर पडून कपाशीच्या पातीवर एक पतंग १०० ते १५० अंडे घालत असल्याने त्या कालवधीत शेतकर्यानी निंबोळी अर्काची ५% फवारणी केल्यास किडीचे नियंत्रण होण्यासाठी मदत होते. त्या बरोबर युरियाचा नियंत्रित वापर करणे,मोनोक्रोटोफास व आसाटाप यांचे मिश्रण करुन फवारणी शक्यतो टाळावे. कारण त्यातून शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. बोंडअळीच्या नियत्रंणासाठी शेतीची पूर्व मशागत करताना खोलगट नांगरणी करणे गरजेचे आहे. कारण उन्हाळ्यात ४५ डिग्री तापमानात ही बोंड अळी जिवंत असते तिचा नायनाट करण्यासाठी हा उपाय कृषी विभागाकडून आल्याने त्याची अंमलबजावणी केली तरच किडींवर नियंत्रण होण्यासाठी मदत होते. सध्या सोयाबीन वर खोडमाशी चक्रभुंगा या किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकर्यानी किफायत किंमत असलेले ट्रायझोफाॅस हे कीटकनाशक १६ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारुन किडिंवर नियंत्रण करता येते, सध्या शेतात कपासीवर न उमलेली कपासीचे फूल असेल तर ते शेतकर्यानी ती कळी तोडून नष्ट करावी. कारण त्या न उमललेल्या फुलात अळी शंभर टक्के असते असा दावा कृषीविभागाने सर्वेक्षणाअंती केला आहे. त्या न उमललेल्या फुलांना डोमकळी असे म्हणतात. अशी फुले आढळल्यासे ते तोडून त्यातील अळी नष्ट केली तर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. शेतात प्रकाश सापळे लावले तर बोंडअळीचा प्रादूर्भाव कमी करण्यास बरीच मदत होते. कपाशीला सिंचन करताना मर्यादितपणे सिंचन करावे, जास्त प्रमाणात सिंचन केल्यास पिकाचा कालावधी वाढून बोंड अळीला जीवनदान मिळू शकते. त्यासाठी सामूहिक एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास बोंड अळीचे नियंत्रण शक्य आहे,आज काही सोशल मीडियावर बोंड अळी संदर्भात चुकीचे संदेश व्हायरल होत असुन शेतकर्यानी त्याची पडताळणी करुन कृषीविभागाशी संपर्क साधावा व योग्य मार्गदर्शन घेऊन शेती तील बोंड अळी कसी नियंत्रण करता येईल यावर विचार करावा तसेच कृषी विभागाकडून क्राॅपसॅप प्रल्पका अंतर्गत सर्वेक्षण करुन उपाय सुचविण्यात येत असुन शेतकर्यानी तसे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावे असे तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी पत्रकार परिषद मधे माहिती दिली ,यावेळी पंचायत समिती मारेगाव कृषी अधिकारी बेंडे ,कृषी विस्तार अधिकारी वाघमारे उपस्थित होते.