मार्डीमध्ये मोटरसायकल व ऑटोची धडक, एक ठार

0

तालुका प्रतिनिधी, मारेगाव:

तालुक्यातील मार्डी येथील आदर्श हायस्कूलसमोर भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नामदेव नथुजी बोरूले (45) राहणार कर्मवीर वार्ड वरोरा जिल्हा चंद्रपूर व गौरव महादेव डाखरे वय 26, रा. फेपरवाडा हे दोघे डबलसीट मार्डीकडून वणीकडे येत होते. तर त्याच वेळी बाळू साळवे हा ऑटोने मार्डीकडे जात होता. यात मार्डीतील आदर्श शाळेसमोरील वळणावर ऑटोने बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात बाईकवर असेलेले दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी नेले. यात नामदेव बोरूले यांचा वाटेत मृत्यू झाला. तर गौरवची परिस्थीती गंभीर आहे.

सध्या गौरववर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर ऑटोतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.