सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिक्षकांच्या मागणीसाठी दररोज शिक्षण विभागात पालकांचा राडा होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गांसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी रिक्त शिक्षकांच्या जागा भरावी, या मागणीसाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. .
झरी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत ४१ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देण्यास एक शिक्षक असमर्थ ठरत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी शिक्षकाची मागणी केली. परंतु, शिक्षक मिळाला नसल्याने शाळेतून मुलांना काढत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या झरी येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नसल्याने खेद व्यक्त होत आहे..