महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणारा पूल उखडला
सुशील ओझा, झरी : संततधार पावसामुळे महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा दिग्रसनजीकचा पूल उखडला आहे. परिणामी वाहतूक ठप्प झाली असून, गावांचा संपर्क तुटला आहे..
तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्या जवळील शेती जलमय झाली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. आदीलाबाद वरून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेसही बंद झाल्या आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. .
झरी तालुक्यातील बहुतांश लोकांचे तेलंगणात नातेवाईक आहे. त्यामुळे त्यांची मोठी येजा असते. परंतू संततधार पावसामुळे आलेल्या पूराने दिग्रसनजीकचा पूल उखडल्याने संपर्क तुटला आहे. दोन दिवस सतत या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुलाजवळील संपूर्ण माती दगड वाहून गेले. त्यामुळे पुलाला मोठे भगदाड पडले. .