मारेगावात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

व्यापा-यांनी, औषधी विक्रेत्यांनी पुकारला होता बंद

0

बहुगुणी प्रतिनिधी, मारेगाव: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व चेंबर्स ऑफ़ कॉमर्स व्यापारी संघटनेच्या वतीने मारेगावत कडकड़ीत बंद ठेवण्यात आला. या संदर्भात व्यापारी संघटना आणि औषध विक्रेत्यांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. देश्या

सध्या ऑनलाईन व्यापारात वाढ झाली आहे. लोकांना इतर वस्तूंसोबतच आता औषधीही ऑनलाईन मागवण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका व्यापा-यांना बसत आहे. या विरोधात औषधी विक्रेता व चेंबर्स ऑफ़ कॉमर्स संघटनेच्या वतीने मारेगाव बंद पाळण्यात आला.
निवेदनात ई व्यापार थांबवण्यात यावा, 100% एफडीआय सिंगल ब्रँडमध्ये दिलेली अनुमति परत घेण्यात यावी, जीएसटीला 2 स्लॅब टैक्स व्यवस्था तथा अधिक पेनाल्टी दहा हजारांच्या वर न जाऊ देणे, व्यापा-यांना कमीत कमी व्याज दरावर कर्ज़ उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या करण्यात आल्यात.

निवेदन संदीप खुराना, दुष्यंत जैस्वाल, अनंत मांडवकर, राजू जैस्वाल, कार्तिक शेंडे, नीलेश जुमडे, नीलेश गुंडावर, अनिल झाडे, अनामिक बोढे, मुजफ्फर शेख आदी व्यापारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.