खासगी शाळेतील शिक्षकांना 2019 पर्यत बीएड पूर्ण करणं अनिवार्य
कॉन्व्हेंटमधल्या अनेक शिक्षकांच्या नोकरीवर येऊ शकते गदा
नवी दिल्ली: शासकीय तसेच खासगी शाळांमधील बीएडची पदवी प्राप्त न केलेल्या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पयर्ंत पदवी पूर्ण न केल्यास अशा शिक्षकांना पदावरून कमी करण्यात येणार आहे.
शुक्रवारी केंद्र सरकारकडून लोकसभेत ही माहिती देण्यात आली. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नि:शुल्क आणि अनिवार्य शिक्षण अधिकाराचे विधेयक लोकसभेत सादर केले. यात ही माहिती दिली.
खासगी शाळांमध्ये जवळपास साडेपाच लाख आणि सरकारी शाळांमध्ये अडीच लाख शिक्षकांनी पदासाठी पात्र असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. याच कारणास्तव अशा शिक्षकांनी २0१९ पयर्ंत बीएडची पदवी घेणे आवश्यक असल्याचे जावडेकरांनी सांगितले. जावडेकर असेही म्हणाले की…
डिग्री नसताना एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवने हे फार धोकादायक आहे. त्यामुळे या शिक्षकांनी डिग्री घेणे बंधनकारक आहे. तसेच, 2019 पर्यंत सर्व शिक्षकांना योग्य ती पात्रताही मिळवावी लागणार आहे. अन्यथा त्यांचीही नोकरी संकटात येऊ शकते. शिक्षकांच्या मदतीसाठी एक ‘स्वयं’पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. ज्यात अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, ट्युटोरियल तसेच इतर शैक्षणीक माहिती आणि आवश्यक सामग्री उपलब्ध आहे.
जावडेकर यांनी 10 एप्रील 2017 रोजी लोकसभेत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार विधेयक मांडले होते. या विधेयकात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासोबतच शिक्षकांच्या पात्रतेबाबत चर्चा करण्यात आली होती. दरम्यान, या विधेयकानुसार जर एखाद्या राज्यात शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा आवश्यक त्या पटीत शिक्षकांची संख्या नसेल तेव्हा, अशा स्थितीत ते शिक्षक पाच वर्षांच्या कालावधीत म्हणजेच 31 मार्च 2017 पर्यंत आपली पात्रता पूर्ण करू शकतात, अशी सूट देण्यात आली आहे.