येनक येथे घरफोडी, रोख रक्कमेसह दागिने लंपास

0

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील येनक येथे (दि.११)रविवारी रात्रीच्या दरम्यान घरफोडी झाली. यात रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण पावणे चार लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी शिरपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

शिरपूर पोलिस ठाण्यापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या येनक येथे रामनाथ रामचंद्र गारघाटे यांच्या घरी ही चोरी झाली. रविवारी रात्री गारघाटे कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या स्वयंपाक खोलीचे दार उघडून प्रवेश केला. दरवाजा आतील बाजूस लावून होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चोरट्यांनी स्क्रूड्राइवच्या साहाय्याने कोंड्याचे स्क्रू काढून दार उघडले. कपाटातील मंगळसूत्र, पदक, गोफ, अंगठी असे एकूण १२० ग्रॅम सोन्याची दागिने आणि सहा हजार रोख रक्कम लंपास केले. एकूण अंदाजे पावणे चार लाखाची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली.

सकाळी झोपेतून उठल्यावर कपाट उघडे दिसले. पाहणी केली असता सदर चोरी झाल्याचे दिसून आले. सकाळी रामनाथ गारघाटे यांनी सदर घटनेची फिर्याद शिरपूर पोलिसात दिली.

पोलिस उपनिरीक्षक योगेश द्वंदे, जमादार शांताराम अक्कलवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अज्ञान आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शिरपूर पोलिस पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.